MNS Membership registration | मुंबईतील मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरूवात – tv9
प्रखर हिंदुत्व हे राज ठाकरे यांची भूमिका आहे.तर हिच भूमिका आमचीही आहे. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
मुंबईतील दादरमध्ये मनसेच्या सदस्य नोंदणीला सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत सुरूवात झालेली आहे. तसेच यावेळी त्यांनी माहिम, प्रभादेवी, दादरमध्ये लोकांना या सदस्य नोंदणी कार्यक्रमाची माहिती व्हावी यासाठी प्रभातफेरी देखिल काढण्यात आली होती. यावेळी संदीप देशपांडे यांनी हिंदुत्वावरून पुन्हा एकदा तथाकथित हिंदुत्व नेत्यांवर निशाना साधला. संदीप देशपांडे म्हणाले, आम्हाला या मोहिमेतून लोकांपर्यंत पोहचायचं आहे. आमचं हे दाखवण्यासाठी नाही. प्रखर हिंदुत्व हे राज ठाकरे यांची भूमिका आहे.तर हिच भूमिका आमचीही आहे. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. तर राज ठाकरे हे देशातील एकमेव असे नेते आहेत, त्यांनी नुपूर शर्मांच्या त्या वक्तव्याचे समर्थन केलं होतं. त्यांना आपला पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी स्वतःला तथाकथित हिंदुत्व नेते म्हणवून घेणारे शेपटी घालून बसले होते, असा घणांगात देशपांडे यांनी केलेला आहे.