राज ठाकरे यांची जाहीर सभेआधी सेनाभवनासमोर मनसेचे बॅनर; पोस्टरवरील मजकुराने लक्ष वेधलं
मुंबईतील शिवाजी पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. 2024 ला विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत राज ठाकरे मनसे सैनिकांना काय संबोधित करणार आणि आजच्या राजकीय घडामोडीचा कसा समाचार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : आज गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. या मेळाव्याआधी शिवसेनेचं मुख्यालय असणाऱ्या दादरच्या शिवसेनाभवन समोर बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचा मजकूर आहे. या पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेढलं आहे. मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत.दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाच्या बॅनर ने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Mar 22, 2023 10:29 AM
Latest Videos