मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार; सुप्रिया सुळे संतापल्या, साधला गृहखात्यावर निशाणा
येथे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय युवतीवर ही अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हार्बर मार्गावर धावणाऱ्या एका लोकलमध्ये ही घटना घडली.
मुंबई : मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमध्ये आज मानवताला काळीमा फासणारी घटना घडली. येथे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय युवतीवर ही अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हार्बर मार्गावर धावणाऱ्या एका लोकलमध्ये ही घटना घडली. ही युवती परीक्षेला जात असताना सकाळी साडे सातच्या सुमारास तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्याप्रकरणी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच 8 तासात अरोपीला बेड्या टोकल्या आहेत. यानंतर यावरून शिंदे-फडणवीस सरकारसह गृहखात्यावर आता प्रश्न उठवले जात आहेत. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत संपात व्यक्त केला आहे. तसेच सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी, चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.