मुंब्रा बायपासवरील वाहतूक उद्यापासून बंद राहणार; पर्यायी मार्ग काय असेल? पाहा...

मुंब्रा बायपासवरील वाहतूक उद्यापासून बंद राहणार; पर्यायी मार्ग काय असेल? पाहा…

| Updated on: Apr 01, 2023 | 12:42 PM

Mumbai Mumbra Bypass Traffic Closed : मुंब्रा बायपासवरील वाहतूक उद्यापासून बंद; पर्यायी मार्ग काय? पाहा संपूर्ण व्हीडिओ...

मुंबई : मुंब्रा बायपासवरील वाहतूक उद्यापासून बंद असणार आहे. रस्त्याचं काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या म्हणजे 2 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून हा बायपास वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. परंतु पूर्वनियोजित काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या 2 एप्रिलपासून मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी बंद असणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून मुंब्रा बायपास रस्त्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता बंद असेल. तर या मुंब्रावरून वाहतूक करणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तर अवजड मालवाहू वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळवण्यात आली आहे.

Published on: Apr 01, 2023 12:42 PM