maharashtra politics : ‘स्वतःच्याच प्रतिबिंबावर धडकणार का?’ मनसेचा ठाकरे गटाला बॅनरबाजीतून सवाल?

maharashtra politics : ‘स्वतःच्याच प्रतिबिंबावर धडकणार का?’ मनसेचा ठाकरे गटाला बॅनरबाजीतून सवाल?

| Updated on: Jul 01, 2023 | 3:43 PM

मुंबईकरांची तिजोरी रिकामी केली जात असल्याची आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून त्याविरोधात मुंबई महानगरपालिका विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. याच्याविरोधात भाजप, शिंदे गट आणि आठवले गटाकडून मोर्चा काढून प्रत्यूत्तर देण्यात येणार होतं.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय व्यवस्थेकडून मनमानी कारभार सुरू आहे. प्रमाणाच्या बाहेर पैशांची उधळपट्टी केली जात आहे. तर मुंबईकरांची तिजोरी रिकामी केली जात असल्याची आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून त्याविरोधात मुंबई महानगरपालिका विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. याच्याविरोधात भाजप, शिंदे गट आणि आठवले गटाकडून मोर्चा काढून प्रत्यूत्तर देण्यात येणार होतं. मात्र बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे तो रद्द करण्यात आला आहे. याबाबत भाजप मुंबईचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी माहिती दिली आहे. मात्र ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या याची जोरदार तयारी झाली आहे. मात्र मातोश्री कलानगर परिसरात शिवसेना ठाकरे गटा विरोधात मनसे कडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मोर्चा आधीच मनसेकडून मातोश्री कलानगर परिसरात बॅनरबाजी करत स्वतःच्याच प्रतिबिंबावर धडकणार का असा सवाल करण्यात आला आहे.

Published on: Jul 01, 2023 03:43 PM