Devendra Fadnavis | 'मुंबई महापालिकेवर भ्रष्ट्राचाराचा मोठा विळखा'-tv9

Devendra Fadnavis | ‘मुंबई महापालिकेवर भ्रष्ट्राचाराचा मोठा विळखा’-tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 5:43 PM

मुंबई महानगरपालिका लोकांची ठेवायची नाही आहे, एका परिवाराची ठेवायची नाहीये, ही घराण्याची ठेवायची नाही. जे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं स्वप्न होतं ते पूर्ण करायचे आहे.

मुंबई महापालिका सर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात भाजपची सभा घेण्यात आली. यावेळी फडणवीस म्हणाले, मुंबई ही सुंदर झालीच पाहिजे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र त्याच त्या ठिकाणीच्या सौंदर्यकरणाची काम करणं म्हणजे मुंबईतल्या सामान्य माणसाला धक्का देण्यासारखा आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना, काही लोकांना महाराष्ट्र राज्य हातातून दुःख होत मात्र मुंबई राज्य हे हातातून जाईल की काय याची भिती असल्याचे म्हटलं आहे. तर आता ही मुंबई महानगरपालिका लोकांची ठेवायची नाही आहे, एका परिवाराची ठेवायची नाहीये, ही घराण्याची ठेवायची नाही. जे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं स्वप्न होतं ते पूर्ण करायचे आहे. आणि ही जबाबदारी आपली आहे. कारण बाळासाहेबांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं नाही.

 

Published on: Aug 20, 2022 05:43 PM