चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ नाही तर आम्ही न्यायालयातहा जाऊ
कॉंग्रेसच्या अनेक नगरसेवकांचे आरक्षण बदलले गेले असल्यामुळे चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ नाही तर आम्ही न्यायालयातहा जाऊ असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
सध्या राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून काही दिवसातच शाळा, कॉलेजही सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा मास्क सक्ती करणार का असा सवाल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक आपापली काळजी घ्यायची आहे. आणि मास्क सक्तीचा निर्णय हा टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाबरोबर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयीही त्यांनी सांगितले की, मुंबईतील 21 नगरसेवकांचे आरक्षण बदलले आहे, त्यामुळे महाविकाश आघाडीबरोबर चर्चा तर केली जाणारच आहे. कॉंग्रेसच्या अनेक नगरसेवकांचे आरक्षण बदलले गेले असल्यामुळे चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ नाही तर आम्ही न्यायालयातहा जाऊ असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Published on: Jun 05, 2022 08:37 PM
Latest Videos