Mumbai Municipal Corporation Election : उपमुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या प्रचाराचं नारळ फोडणार, षण्मुखानंद सभागृहात आज भाजपचा मेळावा
Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज प्रचार सुरु करण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपने एक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुलुंड येथील षण्मुखानंद सभागृह होणार आहे.
मुंबई : भाजपकडून (BJP) मुंबई महापालिका जिंकण्यासाठी रणनीती आखळी जात आहे. आज मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Election) प्रचाराचं भाजपकडून नारळ फोडलं जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Election) आज प्रचार सुरु करण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपने एक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मुलुंड येथील षण्मुखानंद सभागृह होणार आहे.आमदार आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष होताच हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘मुंबईकरांना जो बदल अपेक्षित आहे, तो आता होणार आहे. मुंबईचा पुढील महापौर आमचाच होणार आहे,’ असा विश्वास आपूर्वी भाजपचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय. तर भ्रष्टाचारी व्यवस्थेला तडीपार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या ताब्यातून महापालिका हिसकावण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते रणनीती आखत असल्याची देखील माहिती आहे.