आदित्य ठाकरे यांनी केली शिंदे सरकारची पोलखोल, मुंबई महापालिकेचे पैसे दुसऱ्या संस्थेला

आदित्य ठाकरे यांनी केली शिंदे सरकारची पोलखोल, मुंबई महापालिकेचे पैसे दुसऱ्या संस्थेला

| Updated on: Jan 13, 2023 | 6:12 PM

खोके सरकारकडून मुंबई महापालिकेची लूट, मुख्यमंत्री शिंदे यांना मुंबई काय माहित? आदित्य ठाकरे यांचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची घोषणा केली होती. यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मूळ 5 हजार कोटींचे टेंडर वाढवून 6 हजार 80 कोटी रुपयांचे केले आहे.

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी या टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा शिंदे सरकारने केल्याचा आरोप केला आहे. कंत्राटदारांना तब्बल 48 टक्के फायदा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना किती एजन्सी कुठे आणि किती काम करतात याबद्दल माहिती नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनातही अनेक घोटाळे काढले. पण, त्यावर कारवाई सोडा हे खोके सरकार आणखीनच घोटाळे करत आहेत. मुंबईकरांसमोर सत्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.

Published on: Jan 13, 2023 06:12 PM