माननीय मुख्यमंत्रीजी...; अजित पवार यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र

माननीय मुख्यमंत्रीजी…; अजित पवार यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र

| Updated on: Apr 18, 2023 | 3:10 PM

Ajit Pawar Latter to CM Eknath Shinde : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असं अजित पवार म्हणालेत.

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. याबाबत अजित पवार यांनी पत्र लिहिलं आहे. “खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यात निष्पाप 13 अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी करणारं पत्र अजित पवार मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना केवळ 5 लाख रुपयांची मदत करून सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. तसेच या दुर्घटनेमुळे बाधितांना मोफत उपचार देऊन त्यांनाही प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Published on: Apr 18, 2023 03:10 PM