हा तर गद्दारांच्या टोळीचा अयोध्या दौरा!; कुणाचा निशाणा?
अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. हा गद्दारांच्या टोळीचा अयोध्या दौरा आहे. त्यामुळे याला फारस महत्व नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. रामदास कदम काय उद्धवस्त करू म्हणतात ते स्वतःच उद्धवस्त झालेले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बाजूला ठेवून, प्रजेला वाऱ्यावर सोडून सत्ताधाऱ्यांचा अयोध्या दौरा सुरु आहे. राज्यातले महत्वाचे आणि संवेदनशील विषय बाजूला ठेवून हे दौरे करतायेत. उदय सामंत यांनी आपल्या खात्याचं काम करावं. त्यांच्या खात्यात काय सुरु आहे ते पाहावं. बाकी गोष्टींवर बोलू नये, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.
Published on: Apr 09, 2023 02:01 PM
Latest Videos