राज ठाकरे यांची 'ही' भूमिका मला पटली; अमोल कोल्हे यांनी जाहीर सांगितलं

राज ठाकरे यांची ‘ही’ भूमिका मला पटली; अमोल कोल्हे यांनी जाहीर सांगितलं

| Updated on: Apr 27, 2023 | 7:53 AM

Amol Kolhe On Raj Thackeray : राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या बाबतीतील भूमिकेचं स्वागत केलं आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या बाबतीतील भूमिकेचं राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांची हिंदुत्वबद्दलची भूमिका मला फार आवडली. त्यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाची परिभाषा समजावले त्यांच्यासाठी हिंदुत्व काय आहे ते मला पटलं, असं अमोल कोल्हे म्हणाले. राज ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान सडेतोड बेधडक बिनधास्तपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीबद्दल राज ठाकरे यांनी जे काही सांगितलं. ते त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही राज ठाकरे बोलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असुदेत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत यांच्यावर राज ठाकरे यांनी जे काही भाष्य केलेलं आहे. ते ऐकून मला असंच वाटतं की ते निर्भीडपणे बोललेत ते बेधडक बोललेत, असंही ते म्हणालेत.

Published on: Apr 27, 2023 07:51 AM