देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? 'त्या' एका ट्विटने चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? ‘त्या’ एका ट्विटने चर्चांना उधाण

| Updated on: Apr 12, 2023 | 10:33 AM

Anjali Damania Tweet : किळसवाणं राजकारण! मी पुन्हा येईन...,असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या चर्चा होतेय. पाहा व्हीडिओ...

अमरदीप वाघमारे,मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वत्र या ट्विटची चर्चा होतेय. “किळसवाणं राजकारण! मी पुन्हा येईन… आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू…. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या चर्चा होतेय.

Published on: Apr 12, 2023 10:29 AM