‘या’ प्रकरणी संवादातून मार्ग काढवा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा; अजित पवार यांचं वक्तव्य
Ajit Pawar on Refinery Project : 'ते' चर्चेतील प्रकरण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात सध्या आंदोलन केलं जातंय. याचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध केला आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा. पोलिसांची दडपशाही थांबवावी, हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतू विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं. स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असंही अजित पवार म्हणाले आहेत.