‘या’ कारणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा; सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य
Sujat Ambedkar On CM Ekanath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी या दौऱ्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनीही या दौऱ्यावर टीका केली आहे. लोकांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातंय. अर्थव्यवस्था, लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न, बेरोजगारी यासारख्य़ा प्रश्नांकडून लक्ष वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा दौरा केलेला आहे, असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. शिवाय रामदास आठवले यांच्या सभेबाबत प्रश्न विचारला असता, त्याविषयी मला काही कल्पना नाही. त्यामुळे नो कमेंट्स, असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. चेंबुरमधील इफ्तार पार्टीसाठी सुजात आंबेडकर आले होते. तेव्हा त्यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली.
Published on: Apr 09, 2023 08:39 AM
Latest Videos