जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

| Updated on: Apr 15, 2023 | 10:59 AM

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. जखमींवरही शासकीय खर्चाने उपचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना त्यांनी प्रकट केल्या.या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई पुणे महामार्गावर दुर्घटना स्थळ आणि रुग्णालयात जखमी भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. थोड्याच वेळात ठाण्यातून हेलिकॉप्टरने प्रवास करत जाणार असल्याची माहिती आहे.

Published on: Apr 15, 2023 10:57 AM