…तेव्हा भाजपचा महाराष्ट्रात सुपडासाफ होणारच; जिग्नेश मेवाणी यांना विश्वास
Jignesh Mevani on BJP : गुजरात मजबूत व्हायला पाहिजे महाराष्ट्र मजबूत व्हायला पाहिजे आणि मानवता मजबूत झाली पाहिजे, असं जिग्नेश मेवाणी म्हणाले आहेत. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
मुंबई : काँग्रेस नेते नसीम खान यांच्या रोजा इफ्तार पार्टीसाठी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी काल मुंबईमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आज रोजा इफ्तार पार्टीच्या निमित्त खऱ्या अर्थाने देशाची संस्कृती दिसली. इथं सगळ्या धर्माचे लोक होते. त्यामुळे देशाच्या विविधतेतील एकता दिसली, असं जिग्नेश म्हणाले. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची युती मजबूत होणार आहे. त्यामुळे भाजपाचा महाराष्ट्रात सुपडा साफ होणार आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकीत मला जर बोलावलं तर मी नक्कीच इथे प्रचारासाठी येईल. जिथे जिथे भाजपची चुकीची कामं, त्यांचे विषमतावादी विचार यांचा विरोध करायचा असेल. तिथे मी जरूर बोलेन, असंही जिग्नेश मेवाणी म्हणाले आहेत.
Published on: Apr 06, 2023 08:07 AM
Latest Videos