राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत; द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं खळबळ
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचपार्श्वभूमीवर एका बातमीने खळबळ उडवली आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचपार्श्वभूमीवर एका बातमीने खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं खळबळ उडाली आहे. योग्यवेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याची बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिली आहे. अजित पवारांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधला असल्याचंही या वृत्तपत्रात म्हणण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी अजित पवारांनी शपथ घेतल्यास सरकर पडण्याची वेळ येणार नाही, असं द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हणण्यात आलं आहे.
Published on: Apr 18, 2023 09:53 AM
Latest Videos