अजितदादा भाजपसोबत येतील, अशी स्वप्न चुकूनही पाहू नका कारण…; ‘या’ नेत्याचा भाजपला इशारा
Sachin Kharat On Ajit Pawar : 2024 ला अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होणार; या नेत्याला विश्वास. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यावर रिपाइंचे नेते सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र राज्यामध्ये सतत भाजपचे नेते अजितदादांबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना माहीत झालंय की अजितदादा 2024 ला मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम तयार करतात, असं सचिन खरात म्हणालेत. आता बावनकुळे म्हणाले ज्याला भाजपची विचारधारा पटली, त्याचं स्वागत परंतु बावनकुळे तुमच्या भाजपचे विचारधारा ही असमानतेची विचारधारा आहे आणि अजितदादा जी विचारधारा मानतात ती विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर यांची समानतेची विचारधारा आहे. त्यामुळे बावनकुळे दिवसाढवळ्या आदरणीय अजितदादांबद्दल मुंगेरीलाल के सपने पाहू नका”, असंही सचिन खरात म्हणाले आहेत.