मुंबईत पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटींग…
काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गणेशोत्सवाच्या ऐन वेळी पावसाने हजेरी लावल्याने बाजार पेठ आणि नागरिकांना मोठा फटका बसला आहे.सध्या आकाश भरून आल्याने दिवसभरात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत कांदिवली आणि मालाड परिसरात पाणीच पाणी करुन टाकले आहे. पहाटेपासून सुरु झालेल्या पावसामुळे मालाड आणि कांदिवली परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचत असल्याने अनेक दुकानातून पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गणेशोत्सवाच्या ऐन वेळी पावसाने हजेरी लावल्याने बाजार पेठ आणि नागरिकांना मोठा फटका बसला आहे.सध्या आकाश भरून आल्याने दिवसभरात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आज पावसाने मुंबईतील काही भागात जोरदार बॅटींग सुरू केल्याने सखल भागाना पाणी साचून त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Sep 04, 2022 09:45 AM
Latest Videos