संजय राठोड यांना मोठा धक्का!, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी पक्षप्रवेश केला.
मुंबई : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन (Poharadevi Mahant Sunil Maharaj inter in Shivsena) बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाचे आमदार आणि मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. या समाजाचा राठोड यांना पाठिंबा आहे. पण आता पोहरादेवीच्या महंतांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
Published on: Sep 30, 2022 12:58 PM
Latest Videos