गद्दार दिन साजरा केल्यास ठाकरे गट, राष्ट्रवादीला पडणार महागात! मुंबई पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांना नोटीस
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड होते. त्यामुळे ठाकरे गटाकडून हा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीही हा गद्दार दिवस साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप महाविकास आघाडीकडून आणि विशेषत: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड होते. त्यामुळे ठाकरे गटाकडून हा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीही हा गद्दार दिवस साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप महाविकास आघाडीकडून आणि विशेषत: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो. त्याचा आधार घेत राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करणार आहे.गद्दार दिवस म्हणून राष्ट्रवादीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. खोके ठेवत राष्ट्रवादीकडून शिंदे गटाचा निषेध करण्यात येत आहे. मात्र असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. तर मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्यात.
Published on: Jun 20, 2023 11:55 AM
Latest Videos