Mumbai Railway Megablock : घरातून बाहेर पडताय? मुंबईकरांचा होणार खोळंबा; मध्य रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

| Updated on: Aug 25, 2024 | 12:23 PM

मुंबईकरांनो... आज रविवारी तुम्ही घराबाहेर पडत असाल आणि विशेषतः रेल्वेच्या या तिनही मार्गावर प्रवास करणार असला तर मेगाब्लॉकच्या वेळा बघूनच घराबाहेर पडा, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. जाणून घ्या मध्य रेल्वेच्या कोणत्या मार्गावर कधी कुठे कसा मेगाब्लॉक असणार आहे.

Follow us on

मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज मध्य रेल्वेने विशेष मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड रेल्वे स्थानक अप आणि डाऊनच्या जलद मार्गावर आज हा मेगाब्लॉक घेतला जात आहे. रविवारी २५ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज सकाळी ११.५ ते दुपारी ३.५ पर्यंत हा मेगाब्लॉक मध्य रेल्वे मार्गावर असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगावच्या दरम्यान धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. यासोबतच हार्बर रेल्वेच्या पनवेल आणि वाशी या रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी १०.३३ ते दुपारी ३.५० पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.