राज ठाकरे यांचा काल सरकारला इशारा अन् आज कारवाई; माहिम दर्गाह परिसरात हालचाली वाढल्या

राज ठाकरे यांचा काल सरकारला इशारा अन् आज कारवाई; माहिम दर्गाह परिसरात हालचाली वाढल्या

| Updated on: Mar 23, 2023 | 9:45 AM

राज ठाकरे यांनी काल सरकारला इशारा दिला. त्यानंतर आता आज कारवाई करण्यात आली आहे. माहिम दर्गाह परिसरात हालचाली वाढल्या आहेत. पाहा व्हीडिओ...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. राज ठाकरेंनी काल इशारा दिल्यानंतर आज कारवाईला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाईला सुरूवात केली आहे. अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झाली आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसंच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Published on: Mar 23, 2023 09:39 AM