एकनाथ शिंदे यांना सभा घेण्याचा छंद जडलाय, पण त्यापेक्षा ‘हे’ काम करा; संजय राऊत यांचा सल्ला
Sanjay Raut on CM Eknath Shinde : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सध्या काहीच काम नाही. उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम-नैऋत्य- अग्नेय अशा सभा घेत फिरत आहेत. त्यांना सभा घेण्याचा छंद जडलाय. त्यापेक्षा लोकांच्या हिताची कामं करा, राज्याचा राज्यकारभार करा. लोकांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या. चांगल्या निर्णयाची महाराष्ट्राला सध्या गरज आहे”, असं राऊत म्हणालेत. संजय राऊत मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभांवर भाष्य केलंय.
Published on: Mar 27, 2023 10:27 AM
Latest Videos