संजय राऊत यांनी नमस्कार केला, हसले पण मी...;  संजय शिरसाट यांनी 'त्या' भेटीची कहाणी सांगितली...

संजय राऊत यांनी नमस्कार केला, हसले पण मी…; संजय शिरसाट यांनी ‘त्या’ भेटीची कहाणी सांगितली…

| Updated on: Feb 27, 2023 | 3:24 PM

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यात आज भेट झाली. वरळी सी लिंकवर या दोन नेत्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? पाहा...

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यात आज भेट झाली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? हे संजय शिरसाट यांनी सांगितलं. संजय राऊत आणि सुनील राऊत गाडीतून येत होते. मीही येत होतो. तेव्हा त्यांनी मला नमस्कार केला, मीही केला. संजय राऊत हसले मीही हसलो, अशी आमची भेट झाली. या भेटीने मला आनंद झाला, असं शिरसाट म्हणाले. राजकारणातील विरोधक जरूर आहोत. पण आम्ही दोघे काही वैयक्तिक वैरी नाही, असंही ते म्हणाले.

Published on: Feb 27, 2023 03:24 PM