एकीकडे लाहीलाही करणारं ऊन तर दुसरीकडे पावसाची शक्यता; जाणून घ्या मुंबईतील तापमान
एप्रिल महिन्यात मुंबईचं तापमान वाढलं आहे. तर दुसरीकडे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात मुंबईचं तापमान वाढलं आहे. मुंबईत वातावरणात बदल कधी ढगाळ तर मध्येच उन्हाचा तडका पाहायला मिळतोय. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात 4 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीतील 25 दिवसांत समुद्रात 4.51 मीटर ते 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.जून महिन्यात ५ दिवस, जुलै महिन्यात ६ दिवस, ऑगस्ट महिन्यात ८ दिवस तर सप्टेंबर महिन्यात ६ दिवस असे एकूण 25 दिवस समुद्रात साडेचार मीटरपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जर त्याच दिवशी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत 26 जुलै 2005च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ शकते असं असं बोललं जातंय.
Published on: Apr 20, 2023 12:54 PM
Latest Videos