संजय राऊत यांना आलेली धमकी आणि श्रीकांत शिंदे यांचा काय संबंध? शिवसेनेच्या नेत्याकडून उल्लेख

संजय राऊत यांना आलेली धमकी आणि श्रीकांत शिंदे यांचा काय संबंध? शिवसेनेच्या नेत्याकडून उल्लेख

| Updated on: Apr 01, 2023 | 3:11 PM

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवतारे नेमकं काय म्हणालेत? पाहा व्हीडिओ...

मुंबई : “श्रीकांत शिंदे हे उच्चशिक्षित विद्याभूषित आहेत. असे फालतू कामं ते करत नाहीत. कुणालाही जीवे मारण्याची ते धमकी देत नाहीत. ते चांगल्या परिवारातील सदस्य आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप केले जातात. संजय राऊत श्रीकांत शिंदेंवर आरोप करत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे”, असं म्हणत विजय शिवतारे यांनी राऊतांवर टीका केली आहे.संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. हा केवळ राजकीय स्टंट आहे, असंही विजय शिवतारे म्हणाले आहेत. ते मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Published on: Apr 01, 2023 03:11 PM