“संजय राऊत यांना रात्री कुणीतरी मारत असल्याची स्पप्न पडतात, अन् सकाळी ते माध्यमांना सांगतात”, कुणाचं टीकास्त्र?
Sanjay Raut Death threats Case : खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत हे क्रिझोफ्रेनिक झालेले आहेत. त्यांना रोज रात्री स्वप्नात येतं की कुणीतरी त्यांना मारायला येतंय.तेच ते सकाळी प्रसार माध्यमांना सांगतात. त्यांना कुठल्यातरी चांगल्या डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. सगळ्यांना विनंती आहे की, त्यांना ब्रिजकॅंडी रुग्णालयातल्या प्रसिद्ध डॉक्टरांना दाखवावं. त्यांच्यावर उपचार करावेत, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
Published on: Apr 01, 2023 02:56 PM
Latest Videos