मुंबईमध्ये शिवसेनेकडून वॉकथॉनचे आयोजन
मुंबईत (Mumbai) कोरोना चा प्रभाव कमी होऊ लागताच आता विवीध खेळ, मॅरेथॉन, वॉकथॉन (Walkathon) ला नागरिक चांगला प्रतिसाद देऊ लागले आहेत.
मुंबई : मुंबईत (Mumbai) कोरोना चा प्रभाव कमी होऊ लागताच आता विवीध खेळ, मॅरेथॉन, वॉकथॉन (Walkathon) ला नागरिक चांगला प्रतिसाद देऊ लागले आहेत.आज सकाळी अंधेरी (Andheri) पश्चिम शिवसेनेच्या वतीने जुहू चौपाटी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती चे औचित्य साधून वॉकथॉन चे आयोजन करण्यात आले होते.पाच किलोमीटर ची ही वॉकथॉन होती.यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे या वॉकथॉन मध्ये महिला आणि जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.शिवसेनेतर्फे दरवर्षी अंधेरी मध्ये अंधेरी महोत्सव चे आयोजन केले जाते.
Published on: Feb 13, 2022 12:54 PM
Latest Videos