मरिन ड्राईव्हमध्ये हॅप्पी संडेचे आयोजन, भर पावसात मुंबईकरांची तुफान गर्दी!
कालपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकर पाऊस आणि विकेंडची मजा घेत आहेत. पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्हवर आले आहेत. दरम्यान दर रविवारचे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये हॅप्पी संडेचे आयोजन केले जाते.
मुंबई : कालपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकर पाऊस आणि विकेंडची मजा घेत आहेत. पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्हवर आले आहेत. दरम्यान दर रविवारचे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये हॅप्पी संडेचे आयोजन केले जाते. या उपक्रमामध्ये वरळी येथील दोन युवक या ठिकाणी येऊन मरीन ड्राईव्ह परिसरात येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या डान्स स्टेप्स शिकवतात़. हाच उपक्रम आज देखील राबवण्यात आला परंतु आज मान्सूनचा पहिला रविवार असल्याने या उपक्रमाला अजूनच रंगत चढलेली पाहायला मिळाली. यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबई तसेच उपनगर व दूर वरून देखील मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या उपक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. तर भर पावसामध्ये हा आनंद घेताना मुंबईकर पाहायला मिळत आहेत.
Published on: Jun 25, 2023 03:35 PM
Latest Videos