मुंब्रा, कौसा आणि कळव्याच्या नागरिकांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? आव्हाड उत्तर द्या : नरेश म्हस्के

मुंब्रा, कौसा आणि कळव्याच्या नागरिकांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? आव्हाड उत्तर द्या : नरेश म्हस्के

| Updated on: Mar 31, 2023 | 9:19 AM

आव्हाड यांच्यालर टीका करताना, ते ज्या कळवा, मुंब्रामधून विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते शिवसेनेबरोबर युती करून नाही

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर सडकून टीका केली होती. तसेच शिंदे हे कार्यक्रमात मी सहा महिन्यात हे केलं ते केलं असे म्हणत असतात. पण त्यांनी 6 महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच खंजीर खुपसला असं कोण म्हणतयं जितेंद्र आव्हाड. आव्हाड यांनी आधी, मुंब्रा, कौसा आणि कळव्याच्या नागरिकांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? याचं उत्तर द्याव असही म्हस्के यांनी म्हटलं आहे. तर आव्हाड यांच्यालर टीका करताना, ते ज्या कळवा, मुंब्रामधून विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते शिवसेनेबरोबर युती करून नाही. तर शिवसेनेच्या विरोधात निवडून आलेत. सत्तेसाठी ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले.

Published on: Mar 31, 2023 09:18 AM