Special Report | परळीतल्या बहिणभावात श्रेयवादाची लढाई

| Updated on: Jul 18, 2022 | 1:19 AM

खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या वेळोवेळी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्द असतात. मात्र माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

परळी : परळी मतदारसंधातील विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई मुंडे बहिण-भावात सुरु असल्याचे दिसत आहे.  भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील अनेक प्रश्नांची खऱ्या अर्थाने सोडवणूक झाली. पंकजा मुंडे पालकमंत्री तर खासदार प्रीतम मुंडे होत्या मात्र विकासकामात काहीही केलं नाही, असे राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत. तर केंद्रात सत्ता भाजपची आहे. नितीन गडकरी हे केंद्रीय नेते आहे. खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या वेळोवेळी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्द असतात. मात्र माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Published on: Jul 18, 2022 01:19 AM