कोल्हापुरातील मटणं दुकानं आठ दिवस बंद…
कोल्हापूरात दर बुधवारी मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी असते मात्र महानगरपालिकेच्या सुचनेमुळे आज मटण मार्केटमध्ये मात्र शुकशुकाट जाणवत होता. त्यामुळे पुढील आठ दिवस मटण विक्रेते आणि मटणप्रेमी काय निर्णय घेतात ते आता या आठ दिवसातच कळणार आहे.
जैन धर्मियांच्या पर्यूषण काळानिमित्त कोल्हापुरातील मटण दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना महानगरपालिकेकडून देण्यात आल्या आहेत. नगरविकास खात्याकडून 24 ते 31 ऑगस्टच्या काळात राज्यात पर्यूषण काळ असल्याने आठ दिवस मटण दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची सुरूवात कोल्हापुरातून झाली असली तरी सलग आठ दिवस मटण दुकानं बंद ठेवणं व्यावसायिकदृष्ट्या परवाडणारं नाही तर मटण प्रेमींकडून महानगरपालिकेच्या सुचनेप्रमाणे दोन दिवस मटण दुकान बंद ठेऊ शकता असं मत मटण प्रेमींकडून व्यक्त करण्यात आले आहे. कोल्हापूरात दर बुधवारी मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी असते मात्र महानगरपालिकेच्या सुचनेमुळे आज मटण मार्केटमध्ये मात्र शुकशुकाट जाणवत होता. त्यामुळे पुढील आठ दिवस मटण विक्रेते आणि मटणप्रेमी काय निर्णय घेतात ते आता या आठ दिवसातच कळणार आहे.
Published on: Aug 24, 2022 12:27 PM
Latest Videos