Ravikant Tupkar : अचानक हरभरा खरेदी बंद केल्याने रविकांत तुपकर भडकले, म्हणाले…
नाफेड खरेदी केंद्रांकडून मोठ्या प्रमाात हरभरा घेऊन या असे मॅसेज प्राप्त झाले होते. त्यामुळे शेतकरी आपला माल घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्रांवर रांगा लावून आहेत. मात्र, नाफेडने अचानक खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे
बुलढाणा : जिल्ह्यातील नाफेडने उद्दिष्ठ पूर्ण झाल्याचे कारण सांगत अचानक हरभरा खरेदी केंद्र बंद केले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हे खरेदी केंद्र त्वरित सुरु करुन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अशी माणगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नाफेड अंतर्गत जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी साडे सहा लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ठ होते. यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. यादरम्यान टार्गेट पूर्ण झाल्याचे कारण सांगत नाफेडने अचानक खरेदी केंद्र बंद केली आहेत.
Published on: Apr 12, 2023 09:57 AM
Latest Videos