अग्निवीरांची आजपासून भरती प्रक्रिया! नागपुरात तब्बल 60 हजार उमेदवार भरतीप्रक्रियेसाठी हजर
संपूर्ण विदर्भातून तरुणांनी यात सहभाग घेतलाय. विदर्भातील जवळपास 60 हजार उमेदवारांची ‘अग्निवीरांसाठी’ (Agneevir) नोंदणी झालीय. नागपूरमधील मानकापूर (Mankapur) स्टेडीयमवर 'अग्निवीरांची' भरती प्रकिया सुरु आहे.
नागपूर : विदर्भातील ‘अग्निवीर’ योजनेचसाठीच्या भरती प्रकियेला नागपुरात (Nagpur) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार उमेदवारांची चाचणी झाली. संपूर्ण विदर्भातून तरुणांनी यात सहभाग घेतलाय. विदर्भातील जवळपास 60 हजार उमेदवारांची ‘अग्निवीरांसाठी’ (Agneevir) नोंदणी झालीय. नागपूरमधील मानकापूर (Mankapur) स्टेडीयमवर ‘अग्निवीरांची’ भरती प्रकिया सुरु आहे. अग्निवीर योजनेची घोषणा झाल्यानंतर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उत्तर प्रदेश, राजस्थानात या योजनेविरोधात हिंसक आंदोलनही करण्यात आलं होतं. दरम्यान, आता नागपूरमध्ये अग्निवीर योजनेसाठीच्या भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळल्याचं दिसून येतंय. या भरती प्रक्रियेच्या चाचणीसाठी आलेल्या काही तरुणांशी टीव्ही 9 मराठीने बातचीतही करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा…