Nagpur Aurangabad Super Express way | पावसाने वाहतूक कोलमडली, नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेसवे बंद
Super Express way Closed | विदर्भात पावसाने दमदार बॅटिंग केल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. नागपूर औरंगाबाद सुपर एक्सप्रेसवे बूंद झाला आहे.
Super Express way Closed | गेल्या दोन दिवसांपासून पावसाने (Heavy Rain) तडाखेबंद बॅटिंग केल्याने विदर्भाताली (Vidarbha) जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला आहे. अमरावतीसह, वर्धा (Amravati, Wardha) आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून उंच सखल भाग पाण्याखाली आला आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने (Administrative authority) खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांना थांबविले आहे. पावसाने वाहतूक ही कोलमडली असून नागपूर औरंगाबाद सुपर एक्सप्रेसवे (Nagpur Aurangabad Super Express way)अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने धोक्याच्या ठिकाणी वाहतूक बंद केली असून त्यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत. जलद वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर करण्यात येतो. परंतू हा मार्गही पावसामुळे बाधित झाला आहे.