पडळकरांना जोडे मारा, 1 लाख घ्या, कुणी जाहीर केलं इनाम?
पवार कुटुंबासोबत पडळकर यांचा जुना राजकीय हिशोब आहे. मात्र, आता तेच अजित दादा भाजपसोबत सत्तेत आहेत. मात्र, जुन्या वैचारीक ठिणग्या काही शांत होताना दिसत नाही. त्यामुळेच पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत आहेत. मात्र, यावेळी अजीतदादा यांच्यावर केलेली टीका अजितदादा समर्थकांच्या जिव्हारी लागलीय.
नागपूर : 20 सप्टेंबर 2023 | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्र्वादिचे नेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. यावरून अजितदादा गटाने आता गोपीचंद पडळकर यांना जोडे मारा आणि 1 लाख रुपये इनाम मिळवा असं जाहीर केलंय. अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू आहे अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी अपमान करण्यासाठी दादांना घेतलं का? अशा टोला लगावला होता. तर, आमदार रोहित पवार यांनी BYTE रोहित पवार आता दादांसोबतचे नेते शांत का? असा सवाल केला होता. तर, अजित दादा यांच्यावरील जहरी टीकेनंतर अजित पवार गटाचे नेते आता आक्रमक झालेत. पडळकर यांना जो जोड्यानं मारणार त्याला 1 लाख रुपयांचं ईनाम देणार, अशी घोषणाच अजित पवार गटाचे नागपूरचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली. तसंच नागपुरात पडळकर आले तर मार खाल्ल्याशिवाय परत जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. मात्र, यावरून भाजप आणि अजितदादा गत आमनेसामने आल्याचं पहायला मिळतंय.