महाविकास आघाडीच्या नागपूरमधील वज्रमूठ सभेला भाजप आणि स्थानिकांचा विरोध
विद्यार्थ्यांच्या परीक्षा, मैदानात होणारे खड्डे आणि वाहतुकीचा प्रश्न उद्भवणार असल्याने स्थानिकांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला विरोध केलाय. सभेला परवानगी देऊ नये यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी एनआयटीला पत्र देणार आहेत.
नागपूर : 16 एप्रिलला नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नागपुरमधील दर्शन कॉलनी मैदानात वज्रमुठ सभा होणार आहे. पण महाविकास आघाडीच्या सभेला स्थानिक खेळाडू आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय. मुलांना खेळण्यासाठी हे मैदान आहे. पण इथे राजकीय सभा होणार असेल तर हे योग्य नाही. त्यामुळे सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी करणार आहोत , असं स्थानिकांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी मात्र याच मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहे. भर वस्तीत ही सभा होत असल्याने आणि ज्या ठिकाणी ही सभा होतेय, ते खेळाचं मैदान असल्याने स्थानिकांनी याला विरोध केला आहे.
Published on: Apr 05, 2023 02:22 PM
Latest Videos