Nagpur Updates : आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
Nagpur Violence Mastermind Fahim Khan News : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर आज नागपूर पालिकेने कारवाई केली आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील म्होरक्या फहीम खान याच्या घरावर आज नगपूर पालिकेने बुलडोजर फिरवलं आहे. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने ही तोडक कारवाई केलेली आहे. फहीम खान याच्या घरचा अतिक्रमण केलेला भाग हा पाडण्यात आलेला आहे.
नागपूरमध्ये आठ दिवसांपूर्वी दोन गटात तूफान राडा झाला होता. या घटनेत जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आलेली होती. त्यात काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. या संपूर्ण राडा प्रकरणात पोलिसांनी फहीम खान याला मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेतलेलं आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत फहीम खानची रवानगी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज नागपूर पालिकेने आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर फिरवलं आहे.
दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपूर राड्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ही आरोपींकडून वसूल केली जाईल असे संकेत दिलेले होते. तसंच यापैकी कोणाचं बेकायदा बांधकाम असेल तर ते पाडलं जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला

शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'

'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं

'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
