Nagpur Violence : ‘त्यांच्याकडे हत्यारं होते आणि त्यांनी अचानक..’ ; डिसीपी कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
Nagpur Violence 40 Police Injured : नागपूर हिंसाचारादरम्यान तब्बल 40 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूर हिंसाचारादरम्यान तब्बल 40 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या जखमी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर या जखमी पोलिसांशी टीव्ही9 च्या प्रतिनिधीने बातचीत केली. यावेळी या पोलिसांनी प्रत्यक्ष अनुभवलेला हिंसाचाराच्या घटनेचा थरार सांगितला. या घटनेत पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. तर शशिकांत सातव यांना मोठा दगड लागल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे.
आम्हाला रात्री या घटनेची माहिती मिळाल्यावर आम्ही चिटणीस पार्क या भागात पोहोचलो तेव्हा तिथे मोठ्या संख्येने जमाव उपस्थित होता. त्यांच्याकडे घातक शस्त्र सुद्धा होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जात होती. काहींच्या हातात पेट्रोलने भरलेल्या काचेच्या बाटल्यासुद्धा होत्या. आम्ही त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्यांनी यांच्यावर देखील हल्ला केला, असं यावेळी बोलताना निकेतन कदम यांनी सांगितल.