भाजपनं आमदार राहुल कुल यांना निलंबित करावं; कुणी केली मागणी? पाहा…
MLA Rahul Kool : आमदार राहुल कुल यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे. पाहा...
पुणे : दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींची अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी हे गंभीर आरोप केलेत. याबाबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि तक्रारदार नामदेव ताकवणे यांनीही चौकशीची मागणी केली आहे. भाजपनं आमदार राहुल कुल यांना निलंबित करावं. या कारखान्यातील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी कुल यांना निलंबित करा, अशी मागणी आपण पक्षश्नेष्ठींकडे मागणी करणार असल्याचं ताकवणे यांनी सांगितलं आहे.
Published on: Mar 13, 2023 03:30 PM
Latest Videos