राज ठाकरेंच्या नातवाचा आज नामकरण सोहळा, ‘शिवतीर्थ’ फुलांनी सजले
आज राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या परिवारामध्ये काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. हा नवा पाहुणा म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचा मुलगा होय. आज या चिमुकल्याचा नामकरण सोहळा आहे. नामकरण सोहळ्यानिमित्त राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले शिवतीर्थावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवतीर्थ पाहुण्यांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे.
Published on: May 06, 2022 09:16 AM
Latest Videos