लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल सहानुभूती, पण निवडणूक आम्हीच जिंकणार- नाना काटे
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाना काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहा...
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाना काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने आम्हा सगळ्यांनाच दु:ख झालं. जगताप कुटुबांबद्दल सहानुभूती जरूर आहे. पण ही पोटनिवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होतेय. त्यामुळे ही निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केलाय.
Latest Videos