राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल; नाना पटोले यांचा भाजपवर टोला; म्हणाले, कुसत्तेच्या विरोधात गांधींचाच विजय

राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल; नाना पटोले यांचा भाजपवर टोला; म्हणाले, “कुसत्तेच्या विरोधात गांधींचाच विजय”

| Updated on: Aug 07, 2023 | 11:37 AM

राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद, 7 ऑगस्ट 2023 | मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पितळ उघडं होईल म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाी करण्यात आली. पण सत्यमेव जयते. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली आहे. कुसत्तेच्या विरोधात गांधींचाच विजय होईल. याची सुरुवात झाली आहे. आज राहुल गांधी लोकसभेत जातील आणि तिथे चैतन्य निर्माण होईल. मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात राहुल गांधी लोकसभेत आवाज उपस्थित करती.”

Published on: Aug 07, 2023 11:37 AM