BJP नेत्यांच्या बुद्धीची मला कीव येतेय : Nana Patole-TV9
चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणालेत. विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल असे नाना पटोले म्हणाले आहेत.
मुंबई : राज्यात सध्या नाना पटोलेंच्या (Nana Patole) वक्तव्याविरोधात भाजप (BJP) आक्रमक झाली असून राज्यात जोरदार गदारोळ सुरू आहे. चंद्रकांत पाटलांनी तर पटोलेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, त्याला आता नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणालेत. विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल असे नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यात सत्य समोर येईल. पंतप्रधान पदाची गरीमा संपवणे हाच भाजपचा धंदा आहे. त्यामुळे त्यांनी हे सुरू केले आहे. आम्हीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. असेही ते म्हणाले. तसेच मोदी नावाचा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, जबाब नोंदवणे सुरू आहे, अशी माहिती नाना पटोलेंनी यावेळी दिली आहे.