भाजप खासदाराची पुन्हा जीभ घसरली, अनिल बोंडे यांचं डोकं फिरलंय त्यांना… काँग्रेसवरच्या टीकेला थेट प्रत्युत्तर
काँग्रेसच्या जंगली प्राण्याने तिवसा मतदारसंघ उद्धवस्त केल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल बोंडे यांचं डोकं फिरलंय त्यांना मनोरूग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे प्रत्युत्तर देत पटलवार केलाय.
मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : भाजप खासदार अनिल बोंडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरली आहे. दरम्यान यानंतर यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसच्या जंगली प्राण्याने तिवसा मतदारसंघ उद्धवस्त केल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल बोंडे यांचं डोकं फिरलंय त्यांना मनोरूग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे प्रत्युत्तर देत पटलवार केलाय. ‘डुक्कर वावरात आले की त्यांना झटका देण्यासाठी मशिन असते. तुमचा तिवसा मतदारसंघ पूर्ण उद्धवस्त केला ना काँग्रेसच्या जंगली प्राण्याने…’ असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं. अनिल बोंडे यांच्या टीकेला नाना पटोले आणि यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलंय.