शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, नाना पटोले यांनी प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरलं!
आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारलेल्या शेतीच्या प्रश्नांवरून सरकारचं लक्ष वेधलं.
मुंबई | 19 जुलै 2023 : आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारलेल्या शेतीच्या प्रश्नांवरून सरकारचं लक्ष वेधलं. ते म्हणाले की, “राज्यात बियाणं आणि खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्याबाबत सरकारचं काय नियोजन आहे. हे सगळं खरं आहे का? बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतंय. दागिने विकून शेतकऱ्यांना शेती करण्याची वेळ येत आहे. हे खरं आहे का? हे विचारलं गेलं तेव्हा हे खरं नाही, असं सांगण्यात आलं. हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करतं आहे. माझ्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांवरून हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचं दिसतं आहे. बोगस बियाणांच्या बाबत जो भ्रष्टाचारावर सरकार कारवाई का करत नाही?”