भाजप विरोधात रणनीती घेण्याबाबत नाना पटोले सांगतात
भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की आर्थिक आणीबाणी लावण्याचा प्रकार भाजपकडून सुरु आहे, त्याला काँग्रेसकडून जोरदार विरोध दर्शवण्यात येत आहे.
सध्या देशात भाजपकडून एक प्रकारची आणीबाणीच लागू केलेली आहे, वेगवगेळ्या माध्यमातून जनसामान्यांना आर्थिक भूर्दंड या सरकारमुळे बसत आहे. सध्या भाजपकडून जीएसटी लावण्याचा प्रकार चालू केला आहे, त्यामुळे देशातील गोरगरीब जनतेची ही लूट आहे. त्यामुळे भाजप सरकारकडून फक्ट जनसामान्यांची लूट होत असल्याची टीका काँग्रेसकडून होत आहे. या विरोधात काँग्रेसकडून आवाज उठवण्यात येणार आहे. देशातील विविध समस्या, महागाई आणि जनसामान्यांना भोगाव्या लागणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्याविरोधात भाजपविरोधा रणनिती आखण्याचे काम काँग्रेस करत आहे अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की आर्थिक आणीबाणी लावण्याचा प्रकार भाजपकडून सुरु आहे, त्याला काँग्रेसकडून जोरदार विरोध दर्शवण्यात येत आहे.
Published on: Aug 02, 2022 05:51 PM
Latest Videos