मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारीत व्यस्त, नाना पटोले यांचा निशाणा

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारीत व्यस्त”, नाना पटोले यांचा निशाणा

| Updated on: Jun 05, 2023 | 8:19 AM

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर होते. यावरूनही नाना पटोले यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दिल्ली वारीतच जास्त व्यस्त आहे.

भंडारा : अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. आम्ही पहाटे गेलो तेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले. पण आता त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, अशी इच्छा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. नरहरी झिरवाळ यांच्या विधानंतर काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना इच्छा असते की त्यांच्या नेता मुख्यमंत्री व्हावा हा स्वभाविक आहे. मुखमंत्री बनण्यासाठी बहुमत असणे आवश्यक आहे”, असं नाना पटोले म्हणाले. रविवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर होते. यावरूनही नाना पटोले यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री दिल्ली वारीतच जास्त व्यस्त आहे. मुखमांत्री व उपमुख्यमंत्री फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहेत.डेपुटेशन मिळालेले हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

Published on: Jun 05, 2023 08:19 AM